भुसावळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पंखे, कुलर न बसवल्यास आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक : शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार


भुसावळ : भुसावळ शहरातील एका खाजगी नामांकित शाळेतील विद्यार्थ्याला वर्गात उष्णतेमुळे चक्कर आल्याचे कळताच शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी त्वरित गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांची भेट घेऊन पंखे, कुलर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

तर आंदोलनाचा इशारा
भुसावळ शहरातील एका विद्यार्थ्याला वर्गात उष्णतेमुळे चक्कर आले व ही माहिती मिळताच शहरप्रमुख दीपक धांडे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन गटशिक्षणाधिकारी वायकोळे यांना भेटून सविस्तर चर्चा केली. शाळेतील प्रत्येक वर्गात चार पंखे, कुलर अशी व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांना हवेशीर वातावरणात शिक्षण घेता येईल, अशी त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. काही संस्था चालकांशी फोनवर चर्चा झाली आहे.

बुधवारी सेंट अलॉयसीस शाळेत व अन्य संस्था चालकांनाही शिवसेना पदाधिकारी भेटणार आहेत. संस्था चालकांनी व्यवस्था न केल्यास शाळेत आंदोलन केले जाईल, असा रोखठोक इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, माजी नगरसेवक कैलास लोखंडे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, शरद जैस्वाल, पिंटू भोई, चेतन भोई, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


कॉपी करू नका.