रात्र गस्तीवरून घरी परतणार्‍या धुळे तालुक्यातील पोलिसाचा अपघाती मृत्यू

0

धुळे : साक्री पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याचा रात्र गस्तीदरम्यान घराकडे परतताना अपघाती मृत्यू झाला. गुलाब शिंपी (36) असे मयताचे नाव आहे. हा अपघात गुरुवार, 27 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आनंदखेडे गावाजवळ घडला.

ट्रकवर आदळली दुचाकी
पोलीस कॉन्स्टेबल गुलाब गोविंदा शिंपी (36) हे धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्याला होते. साक्री पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. ते दररोज दुचाकीने आनंदखेडे ते साक्री अप-डाऊन करीत व बुधवारी रात्रीची ड्युटी असल्याने ते गुरुवारी सकाळी कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते मात्र आनंदखेडे गावाजवळच असलेल्या खाडी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने ट्रक (जी.जे.12-7447) ला मागाहून धडक दिली.

यात गुलाब शिंपी हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी धुळ्यातील हिरे रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मयत कर्मचारी गुलाब शिंपी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 5 वर्षांची मुलगी व तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेने पोलीस दलासह आनंदखेडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.