भरधाव ट्रक-बोलेरोत अपघात : नऊ प्रवासी ठार

0

नवी दिल्ली : राजस्थानमधील करौली जिल्ह्यात बोलेरो आणि ट्रक यांच्यात अपघात झाल्यानंतर त्यात 9 जणांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच करौलीचे जिल्हाधिकारी नीलाभ सक्सेना, एसपी ब्रिजेश ज्योती उपाध्याय, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजवीर सिंह चौधरी, करौली कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील सिंह आणि वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन जिल्हा रुग्णालयात पोहोचले.

दर्शनासाठी जाणारे भाविक ठार
अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बोलेरोमधील सर्व लोक कैला देवी मातेच्या दर्शनासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे. मृतांपैकी बहुतांश मंद्रयाल उपविभाग आणि मध्य प्रदेशातील खिरखिन गावातील रहिवासी आहेत. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.


कॉपी करू नका.