कायद्याचा रक्षकच भक्षक : तरुणीवर बलात्कार करीत ब्लॅकमेलिंग

0

गडचिरोली : कायद्याच्या रक्षकानेच तरुणीचे शोषण करीत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एका पोलिसाने पीडीत तरुणीशी संपर्क साधत घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून प्रेमसंबंध निर्माण करीत लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड लाखांचे दागिने व सव्वा तीन लाखांची मागणी केली.

पोलिसांनी आरोपी कर्मचार्‍यास केली अटक
पद्माकर भगवान भोजने (38) असे अटकेतील कर्मचार्‍याचे नाव आहे. गडचिरोली पोलिस मुख्यालयात कार्यरत कर्मचारी हा विवाहित आहे तर पीडित 27 वर्षीय तरुणी शिक्षण घेते. पत्नीसोबत सोडचिट्टी झाली असल्याची खोटी माहिती पद्माकरने पीडित युवतीला दिली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.

तरुणीला केले ब्लॅकमेलिंग
पीडित युवतीने लग्नासाठी विचारले असता आरोपीने नकार दिला. त्यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केले. दीड लाखांचे दागिने व सव्वा तीन लाखांची मागणीही केली. याची ती पूर्तता करु शकत नसल्याने पीडीतेने 22 जूनला गडचिरोली ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला. तपास उपअधीक्षक सूरज जगताप करत आहेत.


कॉपी करू नका.