एमपीडीएतील वॉण्टेड आरोपीला पुण्यातून बेड्या : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई


जळगाव : तीन गुन्ह्यात पसार तसेच एमपीडीए कारवाईतील वॉण्टेड आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातील थेरगाव भागातून बेड्या ठोकल्या. योगेश उर्फ रितीक डिगंबर कोल्हे (रा.आसोदा ता. जि. जळगांव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव तालुक्यासह मध्यप्रदेशातील नेपानगर पोलिसांना योगेश कोल्हे वॉण्टेड होता. आरोपी नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पहाटे भर पावसात अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली.

रेकॉर्डवरील कुविख्यात आरोप
चोर्‍या व घरफोड्या करण्यात योगेशचा हातखंडा असून तो पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे. वारंवार त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. तरीदेखील त्याच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या वर्तनात कोणताही सकारात्मक बदल दिसून येत नसल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली. तो फरार असल्यामुळे त्याचा शोध पोलिस दलातर्फे सुरू असताना संशयीत पुणे-चिंचवड परिसरात आल्याची कळताच त्याला शिताफीने ताब्यात अटक करण्यात आली. आरोपीला कारवाईकामी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

 


कॉपी करू नका.