गावठी कट्ट्यासह संशयित जाळ्यात : अडावद पोलिसांची कारवाई

0

चोपडा : अडावद पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्‍या संशयीताला अटक केली. गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विलास अंतरसिंग बारेला (24, रा.पाटचारी, अडावद, ता.चोपड)ा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा तालुक्यातील वडगावातील चौकात विलास बारेला हातात अवैधपणे गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवार, 7 जुलै रोजी रात्री 8 वाजता कारवाई करत संशयित आरोपी विलास बारेला याला अटक केली. त्याच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नासीर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास बारेला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल जयदीप राजपूत करीत आहे.


कॉपी करू नका.