धुळ्यासह मालेगाव, नाशिकमधून दुचाकी चोरणारी टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चोरीच्या दहा दुचाकी जप्त : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

0

Malegaon, along with Dhule, two-wheeler stealing gang from Nashik in Dhule Crime Branch’s net धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने धुळ्यासह मालेगाव व नाशिकमध्ये दुचाकी चोरी करणार्‍या टोळीला अटक केली आहे. पकडलेल्या टोळीतील एक संशयीत अल्पवयीन असून आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेल्या तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चतुर दिलीप मोरे (आनंदखेडा, ता.जि.धुळे) व आनन हरी मोरे (आर्णी, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. धुळे शहर व देवपूर तसेच मालेगाव शहरातील दोन व नाशिक उपनगरातील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून अन्य पाच दुचाकी मालकाबाबत चेचीस क्रमांकावरून खातरजमा केली जात आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक अमित साळी, अमरजीत मोरे, संजय पाटील, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, शशिकांत देवरे, हर्षल चौधरी, जितेंद्र वाघ, हवालदार संजय सुरेसे, कैलास महाजन, राजू गीते, गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली. संशयीतांना अधिक तपासासाठी देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.