मुंबई, पुणे, नंदुरबारमध्ये ईडीचे गुन्हे दाखल असलेल्या कृषी अधिकार्‍याला सिनेस्टाईल अटक : बोदवडमध्ये मात्र अपहरणाची चर्चा

0

Cinestyle Arrest of Agriculture Officer who has ED cases registered in Mumbai, Pune, Nandurbar: But there is talk of kidnapping in Bodwad बोदवड : मुंबई, पुणे, नंदुरबारसह बोदवड येथे ईडीचे गुन्हे दाखल असलेल्या बोदवड तालुका कृषी अधिकारी छगन जहागीर पाडवी यांना सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील उजनी रस्त्यावर एका शेताजवळून नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई अत्यंत सिनेस्टाईल झाल्याने सुरूवातीला पाडवी यांच्या अपहरणाची चर्चा रंगली मात्र प्रत्यक्षात पाडवी यांना नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याचे समोर आल्याने अनेक चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

अनेक गुन्ह्यात वॉण्टेड पाडवी
मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नंदुरबार, बोदवड, आणि इडी (प्रवर्तन संचालनालाय) अंतर्गत टेरर फंडिंगचा गुन्हा नोंद पाडवी यांच्याविरोधात दाखल आहे. पाडवी यांचा अटकपूर्व जामीन नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने 25 मे रोजी फेटाळला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक मात्र अपहरणाची चर्चा
पाडवी हे एका उजनी रस्त्यावरील एका शेतात पाहणीसाठी चालकासोबत गेल्यानंतर त्यांच्या वाहनाच्या पुढे एक वाहन लावून कृषी अधिकार्‍यांना वाहनातून उतरवून दुसर्‍या वाहनात बसवण्यात आले. हा प्रकार अपहरणाचा असल्याची भीती पाडवी यांच्या चालकाने बोदवड पोलिसांकडे वर्तवली मात्र याचवेळी पाडवे यांचे भाचे व कुर्ला पोलीस कर्मचारी व या प्रकरणातील फिर्यादी नारसिंग पाडवी समोर आल्यानंतर नेमक्या प्रकरणाचा उलगडा झाला. पाडवी यांचे अपहरण झाले नसून नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केल्याची माहिती बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली.


कॉपी करू नका.