रावेरात व्यापार्‍याला मारहाण : फळ विक्रेत्याविरोधात गुन्हा

0

A merchant was beaten up in Raver : A crime against a fruit seller रावेर  : दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एका व्यापार्‍यास शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एका फळ विक्रेत्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

फळ विक्रेत्यांवर गुन्हा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील बर्‍हाणपूर रोडवरील गोटू शेठ यांच्या दारूच्या दुकाना समोरून येथील हार्डवेअरचे व्यापारी संतोष सुनील गोंदवानी हे त्यांचे वडीलांसोबत मोटार सायकलने जात असतांना फळ विक्रेता शेख सईद शेख कादर यास धक्का लागला. याचे वाईट वाटून सईद याने संतोष गोंदवानी व त्याचे वडील सुनील गोंदवानी यांना शिवीगाळ करून सईद याने संतोष यांना फळ कापण्याच्या ब्लेड पट्टीने मारण्याचा प्रयत्न केला मात्र वार चुकविल्याने त्यांची मागील पँट फाटून नुकसान झाले. ब्लेड पट्टीने मारून टाकण्याची धमकी आरोपीन दिली. याबाबत संतोष गोंदवानी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेख सईदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल ईश्वर चव्हाण करीत आहेत.


कॉपी करू नका.