यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत अत्याचार : आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

0

A minor girl in Yaval taluka was lured and abducted and raped: the accused was sent to police custody for five days यावल : यावल तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे व त्याला भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्यास गुरुवार, 11 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपी पोलीस कोठडीत
शुभम अरुण पाटील (25, यावल तालुका) याने एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 26 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. शनिवारी पोलिसांनी तरुणाला अटक केली तर अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला बाल समिती समोर पाठवण्यात आले. चौकशीत पीडीतेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्याने पोस्कोचे कलम वाढवण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


कॉपी करू नका.