बोदवड शहरात मोहरम उत्सवाला सुरूवात

0

बोदवड : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या मोहरम उत्सवाला सुरुवात झाली आहे. उर्दू तिथी 1 पासून ते 10 तारखेपर्यंत उत्सव चालतो. या उत्सवात संदल सवारीची मिरवणूक भक्तांकडून काढली जाते. उत्सवाच्या प्रारंभी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे बोदवड येथील बोदवड शाहवली बाबा दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी मोहरम समितीचे अध्यक्ष मनोज मोरे, उपाध्यक्ष नईम शाह व संपूर्ण मोहरम उत्सव समिती तसेच बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, शिवसेना जिल्हा कार्याध्यक्ष कलीम शेख, तालुकाध्यक्ष प्रमोद धामोडे, नगरसेवक राजेश नानवाणी, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक हाजी सईद दादा बागवान, नगरसेवक हर्षल बडगुजर, नगरसेवक निलेश माळी, युवा सेना तालुकाप्रमुख अजय पाटील, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजीद पटवे, योगेश भगत, रईस बागवान, लियाकत कुरेशी, सलाम भगत गुरुजी, भगत गुना, भगत गोपाल पाटील व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.


कॉपी करू नका.