इनरव्हील क्लब ऑफ भुसावल रेलसिटी अध्यक्षपदाची मीनाक्षी धांडे यांनी स्वीकारली सूत्रे

पदग्रहण उत्साहात : सचिवपदी किरण जावळे

0

भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण समारंभ रविवारी शहरातील प्रभाकर हॉलमध्ये झाला. अध्यक्ष पदाची सूत्रे रेवती मांडे यांच्याकडून नूतन अध्यक्ष मीनाक्षी धांडे यांनी स्वीकारली तर सचिव पदाची सूत्रे सीमा सोनार यांच्याकडून किरण जावळे यांनी स्वीकारले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय सावकारे, रजनी सावकारे, मीनल लाठी यांची उपस्थिती होती.

वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत
आमदार सावकारे म्हणाले की, लहान तसेच तरुण मुलांचे मानसिक संवर्धन होण्यासह पुस्तक वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी नवीन पदाधिकार्‍यांनी कामे करावे. मीनल लाठी व रजनी सावकाने यांनीही मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष मीनाक्षी धांडे यांनी समाजोपयोगी कार्यक्रम नियमित घेतले जातील तसेच गरजू महिलांना रोजगार मिळावा यासाठी आपण नवीन उपक्रम राबवू, असे सांगितले. यावेळी सर्व क्लब सदस्यांची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.