जामनेरच्या रिक्षा चालक तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

0

A young rickshaw driver of Jamner died in a horrific accident जामनेर : रिक्षाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने जामनेरच्या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार, 9 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात रिक्षातील तीन जण जखमी झाले. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली. हेमंत समाधान माळी (महाजन, 25, रा.शास्त्री नगर, जामनेर) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.

पहूरहून परतताना अपघात
हेमंत माळी हा जामनेर शहरात आई-वडील, दोन बहिणी यांच्यासह वास्तव्यास होता व रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी रात्री तो पहूर येथे गेला असता मंगळवार, 9 जुलै रोजी मध्यरात्री दीड ते 2 वाजेच्या सुमारास जामनेर येथे परतत असताना पहूर रस्त्यावरील न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात हेमंतचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील तिघे किरकोळ जखमी झाले.

कुटूंबियांचा आक्रोश
यावेळी नागरिकांनी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अपघातात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.


कॉपी करू नका.