प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढायचा माझा संकल्प : आमदार मंगेश चव्हाण

शहरातील तितूर नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण : मुख्य रस्त्यांची कामे सुरु असल्याने पुढील काही दिवस फक्त तीनचाकी रिक्षा, दुचाकी व पादचारी यांच्यासाठी खुला राहणार पूल

0

चाळीसगाव : जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असणार्‍या चाळीसगाव शहराची गेल्या काही दशकांपासून विकासाऐवजी भकासपणाकडे वाटचाल होत होती. शहरवासीयांनी मोठ्या विश्वासाने अनेकांना 35 वर्ष नगरपालिकेत एकहाती सत्ता दिली, केंद्रात राज्यात स्वतःच्या पक्षाचे सरकार असताना आमदारकी खासदारकी दिली. मात्र त्यांनी शहराला काय दिले ? साधा एक उंच पूल उभारता आला नाही. घरासमोरचे रस्ते मोठे करता आले नाहीत. नदी सुशोभिकरण नावाखाली नदीत अतिक्रमण करून विद्रूप केली. मुंबई सी लिंक च्या धर्तीवर पूल उभारू सांगितला. ते थडगे आता कपडे सुकवण्यासाठी वापरत आहेत. एकप्रकारे यांनी त्यांना जनतेने दिलेल्या मतांचा अपमान केला, शहरवासीयांची फसवणूक केली आहे मात्र मला आमदारकीची संधी मिळाली तेव्हा सुरुवातीचे अडीच वर्ष विरोधी पक्षाचे सरकार होते. 2021 मध्ये या तितूर नदीला एका वर्षात 7 वेळा महापूर आला. जुन्या पुलाखालून पाणी पास होत नसल्याने तसेच नदीमधील अतिक्रमणामुळे पुराचे पाणी शहरवासीयांच्या घरात, दुकानात घुसले, संसार उघड्यावर आले. माझ्यासाठी हे सर्व दृश्य वेदनादायी होते. त्यावेळीच ठरवले की कुठल्याही परिस्थितीत तितूर नदीवरील हा जुना पूल पाडून त्याजागी नवा पूल उभारायचा आणि आज रेकॉर्डब्रेक अश्या 115 दिवसांच्या वेळेत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी खुला होत आहे. जनतेने संधी दिली म्हणून माझ्याहातून हे विकासकाम उभे राहू शकले त्यामुळे हे विकासकाम नम्रपणे सर्व चाळीसगाववासीयांना अर्पण करतो अशी भावना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

केवळ छोट्या वाहनांना प्रवेश
ते चाळीसगाव शहरातील हॉटेल दयानंद जवळील तितूर नदीवरील नवीन पुलाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. पुलाचे लोकार्पण जरी झाले असले तरी या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणं सुरू असल्याने कामाला व रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून मोठ्या वाहनांना 15 ऑगस्टपर्यंत पुलावर प्रवेश नसणार आहे. त्यामुळे आता पुलावरून तीनचाकी रिक्षा, दुचाकी मोटारसायकल व पादचारी यांना वापर सुरू राहील.

यांची होती उपस्थिती
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मच्छिंद्र राठोड, माजी नगराध्यक्ष डी.आर. चौधरी, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, जेष्ठ नेते उद्धवराव महाजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपअभियंता अनिल बैसाने, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ताई ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, घृष्णेश्वर पाटील, संगीताताई गवळी, एड. सुलभा पवार, वैशाली राजपूत, संजय रतनसिंग पाटील, आनंद खरात, संजय भास्करराव पाटील, ए.ओ. पाटील सर, कपिल पाटील, धनंजय मांडोळे, बाबूलाल पवार गुरुजी, प्रशांत देशमुख, किशोर पाटील, विवेक चौधरी, प्रभाकर चौधरी, रामचंद्र जाधव, अमोल नानकर, अमोल चौधरी, गुरुजी अनिल बैसाणे प्रशांत पालवी बापू अहिरे अजय वाणी, संभाप्पा घुले, साहेबराव राठोड, शैलेंद्र पाटील, सुनील जमादार, राहुल पाटील, किशोर पाटील, निलेश वाणी, प्रदीप पाटील, विनोद घुमरे, मानसिंग राजपूत, बाबा पवार, नाना चौधरी, भाऊसाहेब पाटील, विजय जाधव, अल्लाउद्दीन दादा, अगगा सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पणाला उशीर झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली दिलगिरी
हॉटेल दयानंद जवळील तितूर नदीवरील पूल हा जुन्या राष्ट्रीय महामार्ग 211 वरील शहरात सर्वात महत्वाचा रस्त्यावर असल्याने हा मार्ग बंद झाला तर शहर वासीयांची तसेच बाजारात जाणार्‍या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची मोठी अडचण होणार होती. त्यामुळे मार्च 2024 मध्ये टेंडर प्रकाशित झाल्याल्यानंतर पावसाळा सुरु व्हायच्या अगोदर म्हणजे 100 दिवसांच्या आत या पुलाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केला मात्र काम सुरु झाल्यानंतर नागरिकांनी पुलाची उंची अजून वाढवावी अशी मागणी केली त्यामुळे नवीन परवानगी घेण्यास अजून 20 दिवस उशीर झाला. त्यामुळे पुलाच्या कामाला उशीर झाला मात्र यावर देखील काहींनी राजकारण केलं. काहींनी तर अजून 1 वर्ष पुलाचे काम पूर्ण होणार नाही असे आखाडे बांधले मात्र कंत्राटदार लक्ष्मी कन्स्ट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले, मी त्यांचे देखील आभार मानतो तसेच लोकार्पणाला 15 दिवस उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

पुलावर दोन्ही बाजूला आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून आकर्षक रंगांचे पथदिवे बसविण्यात आले आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलाची शोभा अजूनच वाढणार असून हा पूल शहरवासीयांचे एक आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.


कॉपी करू नका.