मुंबईत संततधार : 11 गाड्या धावताय उशिराने

0

भुसावळ : मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाच रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या असून 11 गाड्या किमान चार ते 14 तास उशिराने धावत आहे. यामुळे नियोजित स्थळी प्रवास करणार्‍या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

11 गाड्या धावताय विलंबाने
मुंबईतील पावसामुळे मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, धुळे-मुंबई एक्सप्रेस ईगतपुरी येथे थांबवण्यात आले तर मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस आणि मुंबई-धुळे एक्सप्रेस या गाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे. कल्याण, ठाणे, दादर व मुंबई येथे जाणार्‍या प्रवाशांची मोठीच गैरसोय झाली तसेच हिंगोली-मुंबई एक्सप्रेस ही नाशिक रोड स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली.

मुंबईमधून भुसावळकडे येणार्‍या 11 रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहेत. त्यात एलटीटी-बनारस एक्सप्रेस ही गाडी 14 तास उशिराने सुटेल तर एलटीटी गोरखपूर एक्सप्रेस आठ तास, एलटीटी-गोरखपूर काशी एक्सप्रेस पाच तास, एलटीटी-हरिद्वार एक्सप्रेस पाच तास, एलटीटी-बरेली एक्सप्रेस पाच तास, मुंबई फिरोजपुर एक्सप्रेस चार तास, एलटीटी-अयोध्या एक्सप्रेस चार तास, एलटीटी-बलिया एक्सप्रेस सहा तास, एलटीटी-पाटणा एक्सप्रेस दीड तास, एलटीटी-सीतापूर एक्स्प्रेस चार तास आणि एलटीटी-गोरखपूर गोदान एक्सप्रेस आठ तास उशिराने सुटणार आहे.


कॉपी करू नका.