यावलला पेहरण-ए- शरीफ च्या पार्श्वभुमीवर बैठक


यावल : यावल पोलीस ठाण्यात शहरात साजर्‍या होणार्‍या पेहरण-ए-शरीफ च्या पार्श्वभूमिवर शनिवारी आयोजकांची बैठक बोलावण्यात आली. यंदाचे आयोजन डांगपूरा मोहल्ल्याकडे आहे. यंदा पेहरण-ए- शरीफ रविवार, 21 जुलै रोजी साजरा होणार आहे. तो शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. शहरात भिलवाडी व सुंदर नगरीत सवारीचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही ठिकाणच्या आयोजनाचा आढावा प्रसंगी घेण्यात आला.

यांची बैठकीला उपस्थिती
शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पेहरण -ए- शरीफ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदाच्या वर्षाच्या उत्सवाचेे आयोजन डांगपुरा मोहल्ला वस्तीतील रहिवाशांच्या वतीने केले जाणार आहे. हा उत्सव रविवार, 21 जुलै रोजी साजरा होणार आहे. पेहरण शरीफच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्यात आयोजन करणार्‍या समितीची बैठक शनिवारी बोलवण्यात आली. या बैठकीमध्ये शेख फारूख शेख मुन्शी, शेख रशीद शेख बशीर, शकील खान निसार खान, उमर अली कच्छी, शेख रहीम शेख कय्यूम सह आयोजकांची उपस्थिती होती. या आयोजकांना फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत मोहरम सणानिमित्ताने शहरातील भिलवाडी व सुंदर नगरी परिसरातील सवारी च्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तेव्हा संदर्भात देखील पोलीस प्रशासनाला कार्यक्रमाच्या आयोजन संदर्भात माहिती देण्यात आली. शहरात सवारी चा कार्यक्रम पेहरण-ए- शरीफ हा कार्यक्रम शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



नवस फेडणार्‍यांनी घ्यावी दक्षता
गेल्या वर्षी पेेहरण-ए- शरीफ मध्ये विविध प्रकारचे नवस फेडतांना भाविक-भक्तांनी चांदीचे दागिणे अर्पण केले व त्यातील बहुतांश दागिणे हे चांदीची केवळ पॉलीश केलेले आढळले होते. यंदा भाविकांनी नवस फेडतांना दागिने पेहरणजवळ चढवण्यापूर्वी ते तपासून घ्यावे, असे आवाहन उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !