जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट वीज बिल माफी मिळावी

भाजपा किसान मोर्चाची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी


मोठे वाघोदे : पावसाळी अधिवेशनात शासनाकडून शेतकर्‍यांसाठी कृषि पंप वीज बिल माफीचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला परंतु अत्यंत महत्वाकांशी व महत्वपूर्ण असणार्‍या या घोषणेत जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हवा तेव्हढा फायदा होणार नाही. जळगाव जिल्ह्यातील बहुतांंश शेतकर्‍यांकडे खालावलेल्या भूजल पातळीमुळे दहा व त्यापेक्षा जास्त एचपीचे शेतीपंप आहेत.संपूर्ण जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खालावलेल्या भूजल पातळीमुळे पाचशे ते सहाशे फुटापर्यंत गेल्यामुळे साडेसात एचपीपेक्षा जास्तीच्या कृषी पंपांचा वापर करावा लागतो त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ही वीज बिल माफी मिळणार नसल्याने शेतकर्‍यांना सरसकट वीज बिल माफी मिळावी, अशी मागणी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे भाजपा किसान मोर्चातर्फे करण्यात आली.

महावितरण अधिकार्‍यांशीही चर्चा
वीज बिल माफिचा जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला लाभ मिळणार नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे शिवाय शेतकरी आधीच मागील दोन-तीन वर्षात अवकाळी पाऊस, वादळ-वारे तसेच नापिकीमुळे त्रस्त आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील साडेसात एचपीपेक्षा जास्त कृषी पंपाचा वापर करावा लागत असणार्‍या शेतकर्‍यांना सुद्धा सरकारने या महत्वकांशी योजनेत समावेश करण्यात यावा आणि त्यांना सुद्धा दिलासा देवून संपूर्ण वीज बिल माफी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याकडे करण्यात आली. महावितरणाचे मुंबई येथील विश्वास पाठक यांच्याशी याविषयावर पदाधिका
कडून सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळ विधासभा आमदार संजय सावकारे, मुक्ताईनगर विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील, चोपडा विधानसभा आमदार लता सोनवणे, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपा किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजपा किसान मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, जिल्हा सरचिटणीस किरण चोपडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन चौधरी उपस्थित होते.


कॉपी करू नका.