नेपाळच्या काठमांडूत टेकऑफनंतर विमान क्रॅश : 18 प्रवाशांचा मृत्यू
नवी दिल्ली : टेकऑफनंतर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 18 कर्मचार्यांचा मृत्यू झाला. नेपाळची राजधानी काठमांडू येथे पोखराकडे निघालेले विमान टेकऑफनंतर क्रॅश झाले. बुधवारी सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. मयतांमध्ये 17 सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते.
अपघातानंतर विमानाला लागली आग
काठमांडू पोस्टनुसार, अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सुरक्षा अधिकार्याने सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली. ते लगेचच विझवण्यात आले.









