पारोळानजीक ट्रक-पिकअपमध्ये अपघात : चालक ठार, तिघे जखमी


Truck-pickup accident near Parola : Driver killed, three injured पारोळा : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अन् महिंद्रा पिकअप गाडीचा समोरासमोर अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. रस्त्याच्या संथगतीने सुरु असलेल्या कामामुळे अन् चुकीच्या दिशादर्शकामुळे हा अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

जागीच एकाचा मृत्यू
राष्ट्रीय महामार्ग 53 वरील तालुक्यातील विचखेडे गावाजवळ जळगावहून धुळ्याकडे जाणारी ट्रक (एम.एच.15, जी.व्ही.7827) ने 27 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास समोरून धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेला येणारी महिंद्रा पिकअप (एम.एच.19, सी.वाय.5076) ला जबर धडक दिली. या अपघातात धुळे येथील चालक रफिक अहमद शरीफ अहमद (40), अखिल अहमद अब्दुल सत्तार तसेच पारोळा येथील सिद्धार्थ नगरमधील पूजा राजेश बागुल (25) हे जखमी झाले तर नगरदेवळा येथील रवींद्र कौतीक बागुल (50) यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.





दरम्यान, रवींद्र बागुल हे आपल्या वहिनींना धुळे येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. उपचार करून ते घरी येत असताना ही घटना घडली. यामुळे पारोळा शहरातील सिद्धार्थनगर भागात शोककळा पसरली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, विचखेडे गावाजवळ गुरूवारी रात्री 10 वाजता तसेच शनिवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांचा अपघात झाला होता. त्यात युवक गौरव नारायण पाटील (वय 30), सुजित पावरा, यश पावरा, लविष पावरा (सर्व रा. धुळे) हे जखमी झालेत. रस्त्याचे कासव गतीने सुरू असलेले काम व चुकीचा दिशादर्शक फलकामुळे दोन दिवसांत हा चौथा अपघात झाला आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !