65 कोटींची सादर केली बोगस बिले : जळगावात एकाला अटक
राज्य जीएसटी जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून धडक कारवाईने व्यापारी वर्तुळात खळबळ

Submitted bogus bills worth 65 crores : One arrested in Jalgaon जळगाव : खोटी बिले देऊन अथवा घेवून शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणार्या जळगावातील मे. स्वामी ट्रेडिंग कंपनीचे मालक नामदेव दौलत धनगर यांना जळगाव जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागाने अटक केल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केल्याचा आरोप आहे.
12.65 कोटींचा कर चुकवला
मे.स्वामी ट्रेडिंग कंपनीचे मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल 65 कोटीची खोटी बिले देऊन शासनाची 12.65 कोटी रुपयांची कर महसूल हानी केली. धनगर यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याने त्यांना 1 रोजी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने 14 दिवसापर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई राज्यकर सहआयुक्त सुभाष परशुराम भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त सूर्यकांत युवराज कुमावत यांच्या नेतृत्वात सहायक राज्यकर आयुक्त माहुल संजयकुमार इंदाणी, सहायक राज्यकर आयुक्त रामलाल सोगालाल पाटील यांच्यासह राज्यकर निरीक्षक प्रशांत शिवाजी रौंदळ, संदीप मखमल पाटील, योगेश सुभाषराव कानडे, स्वप्नील लोटन पाटील, दीपक गोकुळ पाटील, सिद्धाार्थ शंकर मोरे, संध्या नंदकिशोर वाकडे, श्वेता अरुण बागुल व कर सहायक परमेश्वर विश्वासराव इंगळे यांच्या पथकाने केली.
