शाहपूरमध्ये भिंत कोसळून आठ मुलांचा मृत्यू


शाहपूर : श्रावणमासानिमित्त मध्यप्रदेशातील शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून रविवारी सकाळी शिवलिंग बनविण्याच्या कामादरत्यान भिंत कोसळल्याने आठ ते 14 वयोगटातील आठ मुलांचा मृत्यू झाला. ही भिंत 50 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात आले.

अचानक कोसळली तिभंत
मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अचानक मंदिराची भिंत कोसळली. सावनमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी शिवलिंगाची निर्मिती करण्यात येत होती. शिवलिंगाच्या उभारणीत अनेकांचा सहभाग होता. यामध्ये अनेक लहान मुले देखील सहभागी झाली होती. यावेळी भिंत कोसळून 8 मुलांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हा अपघात हरदयाल मंदिरात झाला असल्याचे सांगितले जात आहे. हे मंदिर 50 वर्षे जूने आहे. मंदिराची भिंत जीर्ण झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे की पावसामुळे कोसळली. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये परिसरातून ढीगारा हटवताना नागरिक आणि प्रशासकीय कर्मचारी दिसत आहे. गावातील अनेक नागरिकांनी देखील बचाव कार्यात सहभाग घेतला.



 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !