दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकर यांच्या याचिकेवर आज सुनावणी
Hearing on Pooja Khedkar’s petition in Delhi High Court today पुणे (9 ऑगस्ट 2024) : सातत्याने विविध कारणांमुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांनी आपल्यावर अटकेची कारवाई टाळण्यासाठी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली असून शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी सुनावणी होार आहे. पटियाला कोर्टाने अर्ज फेटाळताच त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
पूजा यांच्या अडचणी कायम
पटियाला हाऊस कोर्टाने 1 ऑगस्ट रोजी पूजा यांचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालय कायम ठेवते की पूजा खेडकर यांना दिलासा देत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
पूजा खेडकर यांच्या वडिलांवर गुन्हा
पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.