बांग्लादेशातील अत्याचाराच्या निषेधार्थ भुसावळकर 16 रोजी कडकडीत बंद पाळणार


भुसावळ (13 ऑगस्ट 2024) : बांग्लादेशातील अल्प संख्य हिंदू, बौद्ध, नागरिक, आबालवृद्ध, महिला-पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवार, 16 रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. भुसावळकरदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

शुक्रवारी शहरातून निघणार मूक मोर्चा
बांग्लादेशातील घटना माणुसकीला काळीमा फासणार्‍या व लज्जास्पद आहेत. निंदनीय घटनेचा जाहिर निषेध करण्यासाठी व तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवरील होणारे अन्याय अत्याचार तातडीने थांबवण्यासाठी जागतिक मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी यासाठी शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 रोजी भुसावळ शहर व परीसरात कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी मूक मोर्चा सकाळी 10 वाजता अष्टभुजा देवी मंदिर ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान काढण्यात येणार आहे. हजारांच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलेले आहे. याप्रसंगी भुसावळ शहर आणि परिसरातील विविध दुकानदार, किराणा व्यावसायीक, उद्योजक, संस्था, शाळा महाविद्यालय संस्थाचालक संघटना, चालक-मालक वाहक संघटना, विविध समाज मंडळाचे प्रमुख,गणपती व नवदुर्गा उत्सव मंडळ प्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.


कॉपी करू नका.