खडका येथे जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला : चौघांविरोधात गुन्हा
Knife attack on youth due to old dispute in Khadka : Crime against four भुसावळ (15 ऑगस्ट 2024) : जुना वाद उफाळल्यानंतर तरुणाच्या पायावर चाकूने हल्ला करण्यात आला तर वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या वडिलांनाही संशयीताने मारहाण केली. ही घटना भुसावळ तालुक्यातील खडका येथे रविवार, 11 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजता घडली. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या वादातून चाकू हल्ला
सुरेंद्रसिंग नारायण पाटील (54, खडका) यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी जुना वाद उकरून काढत त्यांचा मुलगा तेजबहादूरसिंग पाटील (26) याच्या डाव्या पायावर चाकू मारून दुखापत केली तसेच मुलाला सोडवण्यासाठी तक्रारदार गेल्यानंतर त्यांनादेखील संशयीतांनी शिविगाळ करीत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तुषार वासुदेव भोळे, दर्शन दत्तात्रय भोळे, भूषण बेंडाळे, अनुराग नांदेळकर (सर्व रा.खडका, ता.भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय श्यामकुमार मोरे करीत आहेत.