भुसावळात आज शहिद भगतसिंगांच्या जीवनावर नाटीका

प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम : शहरवासीयांना उपस्थितीचे आवाहन


भुसावळ :शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून थोर क्रांतीकारी शहिद भगतसिंग यांच्या जीवनावर नाटीका गुरुवार, 15 रोजी सायंकाळी पाच वाजता सादर केली जाणार आहे. शहरातील मातृभूमी चौकातील संतोषी माता सभागृहात ही नाटीका सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रप्रेमी नागरिकांसह शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.


कॉपी करू नका.