पुन्हा रेल्वे अपघात : कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेसचे 25 डबे घसरले
Another train accident: 25 coaches of Sabarmati Express derailed in Kanpur कानपूर (17 ऑगस्ट 2024) : रेल्वे अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. युपीच्या कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेस (19168) चे 25 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात असताना ही दुर्घटना घडली मात्र सुदैवाने जीवीतहानी झाली नाही तर काही प्रवासी जखमी झाले आहेत.
रेल्वे रूळावरील जड वस्तूंमुळे अपघात
कानपूर शहरापासून 11 किमी अंतरावर भीमसेन आणि गोविंदपुरी स्थानकांदरम्यान पहाटे 2.45 वाजता हा अपघात झाला. रुळावर ठेवलेल्या जड वस्तूला धडकल्याने ट्रेन रुळावरून घसरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एका दगडाला टक्कर दिल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. झाशीचे डीआरएम दीपक सिंह म्हणाले- अपघाताच्या वेळी प्रवाशांना धडकेचा आवाज आला. याची चौकशी केली जाईल.









