आठवीचे दोन्ही विद्यार्थी तलावात बुडाले : धुळे तालुक्यातील घटना
Both students of class VIII drowned in the lake : incident in Dhule taluka धुळे (24 ऑगस्ट 2024) : तलावात पोहण्यासाठी गेलेले दोन विद्यार्थी पाण्यात बुडून मयत झाले. ही घटना धुळे तालुक्यातील निमडाळे येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. हितेश सूर्यवंशी-पाटील (14) व मयूर वसंत खोंडे (14) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले
निमडाळे येथील शाळेत इयत्ता आठवीचा विद्यार्थी हितेश सूर्यवंशी पाटील व मयूर वसंत खोंडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांची वनभोजनासाठी सहल गेली होती. यावेळी परिसरात तलावासह खदान होती. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दोघे तलावात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. शिक्षकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र उपयोग झाला नाही. काही पट्टीच्या पोहणार्यांनी दोघांना बाहेर काढून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.