आमदार एकनाथराव खडसेंनी सोडले भाजपा प्रवेशाबाबतचे मौन : अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहणार !


MLA Eknathrao Khadse broke his silence about joining BJP: otherwise NCP will stay in Sharad Pawar’s group! मुक्ताईनगर (2 सप्टेंबर 2024) : राष्ट्रवादी सोडून भाजपाच्या वाटेवर असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी 2 सप्टेंबर रोजी भाजपा प्रवेशाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भाजपात प्रवेश न झाल्यास आपण पुन्हा मूळ पक्षात अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खडसे म्हणाले : भाजपात प्रवेशाला अनेकांचा विरोध
आमदार खडसे म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी पक्षाला विनंती केली मात्र भाजपाकडून अद्याप प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद नाही. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचा सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सदस्यपदाचा राजीनामा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे दिला मात्र त्यांनी तो राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. तसेच मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) आमदार आहे. शरद पवारांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्यास विरोध केल्याचेही ते म्हणाले.

तर पुन्हा मूळ पक्षात जाणार !
आमदार खडसे म्हणाले की, अशा परिस्थितीमध्ये मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाची वाट पाहील. अन्यथा मी माझा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुन्हा जॉईन करेन आणि कामाला सुरुवात करेन. भाजपात प्रवेश करावा, असं माझं मत पूर्वीपासून होतं. त्यासाठी काही कारणंही होते. त्या संदर्भात मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे चर्चाही केली होती. माझ्याकडे अडचणी होत्या, त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, असं असं वाटलं होतं. मात्र, आता मला विचार करावा लागेल, असं मोठं विधान एकनाथराव खडसे यांनी केलं आहे.

त्या प्रवेशाला काहींकडून विरोध
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याहस्ते आपला भाजपात प्रवेश झाला होता मात्र त्या प्रवेशाला काहींनी विरोध केला त्यामुळे तो प्रवेश जाहीर झाला नाही, असेदेखील आमदार खडसे म्हणाले आहेत. नड्डाजी यांनी माझ्या गळ्यात भाजपाचे मफलर टाकले होते. या कार्यक्रमास विनोद तावडे, खासदार रक्षा खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे आदींची त्यावेळी उपस्थिती होती, असेही आमदार खडसे म्हणाले.


कॉपी करू नका.