प्रक्षोभक वक्तव्य : भाजपचे आमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा

Crime against BJP MLA Nitesh Rane अहमदनगर (2 सप्टेंबर 2024) : अहमदनगरमध्ये सकल हिंदी समाज आंदोलन झाले. त्यात भाजप आमदार नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करुन धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोशल मिडीयात व्हिडिओ व्हायरल
अहमदनगर येथे धर्मगुरू रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ रविवारी सकल हिंदु समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे झाला. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करुन धार्मिक भावना दुखावल्या. मोर्चा संपल्यानंतर रविवारी मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा झाले. त्यांनी राणे विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
गृहमंत्री गप्प का? काँग्रेसचा सवाल
मुख्यमंत्री साहेब हा दंगलखोर कोण आहे? तुम्ही म्हणता विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, मग हे आमदार कोण आहेत? कोणत्या पक्षाचे आहेत? कोणाला घुसून मारण्याची भाषा करत आहे? राज्याचा गृहविभाग कुठे आहे? गृहमंत्री गप्प का? कोणती कारवाई का नाही? तुम्ही कारवाई करणार नाही, करूच शकत नाही. कारण अशा दंगलखोरांना – गुंडांना सोबत घेऊन तुम्हाला दंगल घडवायची आहे. सत्तेसाठी तुम्ही महाराष्ट्र जाळायला निघाले आहात. हे पाप तुमचे आहे. कारवाई करा, तुम्हाला महाराष्ट्राचे भले व्हावे असे वाटत असेल, तर या चिथावणीखोर आमदारावर कारवाई करा, असे विजय वडेट्टीवार सरकावर तोफ डागत म्हणाले.


