जामनेर तालुक्यातील तरुणीचा पुरात वाहिल्याने मृत्यू


A girl from Jamner taluka died due to flood जळगाव (3 सप्टेंबर 2024) : कांग नदीच्या पुलावरून जाताना 18 वर्षीय तरुणीला चक्कर आले व ती पाण्यात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (18, खादगाव, ता.जामनेर) असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटच्या सुमारास घडली.

पायी जाताना तरुणी वाहिनी
पूनम ही मंगळवारी सकाळी क्लासला जाण्यासाठी निघाल्यानंतर कांग नदीच्या पुलावरून जात असतांना शेजारून वाहने ये जा करत होती. पूनम ही पूलाच्या किनार्‍याने जात होती. त्यावेळी तिचे लक्ष पाण्याच्या प्रवाहाकडे गेले असता तिला चक्कर आल्याने ती पुलावरून नदी पात्रात पडून वाहून गेल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नाना साहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकच्या नागरिकांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली. अवघ्या तीन तासात तरुणीचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेला आढळून आला. मयत पूनम बाविस्कर हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. तरुणीचा मृतदेह पाहताच कुटूंबियांनी मोठा आक्रोश केला.

मयत तरुणीचे आई-वडील हे गरीब कुटुंबातील असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मयत तरुणाच्या पश्चात भाऊ, बहिण असा परिवार आहे.


कॉपी करू नका.