एस.टी.कर्मचार्यांच्या संपावर मुख्यमंत्र्यांची शिष्टाई : संप अखेर मागे
Chief Minister’s courtesy on the strike of ST employees : The strike is finally over मुंबई (4 सप्टेंबर 2024) : विविध मागण्यांसाठी एस.टी.कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून संप पुकारला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समितीची महत्त्वाची बैठक मुंबईत झाल्यानंतर अखेरीस संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे शासनाने एस.टी. कर्मचार्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ केल्याने एस.टी.कर्मचारी आनंदले आहेत तर गुरुवारपासून एस.टी.ची चाके पुन्हा गतिमान होणार आहेत.
बैठकीत निघाला यशस्वी तोडगा
एस.टी .महामंडळाच्या कर्मचार्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील आदी उपस्थित होते.
आमची मागणी सरकारने मान्य केली
भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो. आमची मागणी होती की, राज्य सरकारमधील कर्मचार्यांच्या वेतननुसार महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्यांना वेतन मिळावे. किमान त्यांच्या श्रेणीत घेऊन जायला पाहिजे. सरकाने त्यासाठी समिती नेमली होती, त्या समितीने साडेपाच हजारांची मागणी सरसकट करावी, अशी सूचना केली होती. आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी मान्य केली. ज्या कर्मचार्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अडीच हजार, चार हजार आणि पाच हजार अशी सरसकट वाढ केली होती. त्या कर्मचार्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयांची वेतनात वाढ केली आहे, अशी माहिती पडळकर यांनी दिली.