भुसावळातील दातांच्या दवाखान्यातून 35 हजारांचा महागडा एसी लांबवला
An expensive AC worth 35,000 was extended from a dental clinic in Bhusawal भुसावळ (5 सप्टेंबर 2024) : शहरातील आठवडे बाजारातील श्री मसाला सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील दातांच्या दवाखान्यातून चोरट्यांनी महागडा एसी व कॉपर वायरींग लांबवल्याचा प्रकार 2 ते 29 ऑगस्टदरम्यान घडला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
आठवडे बाजारातील श्री मसाला सेंटरच्या पहिल्या मजल्यावर डॉ.सुनील प्रकाश रत्नानी (48, बद्री प्लॉट, भुसावळ) यांचा दवाखाना आहे. दवाखाना बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 2 ते 29 ऑगस्टदरम्यान 19 हजार रुपये किंमतीचा हिटाची कंपनीचा एसी व 16 हजार रुपये किंमतीची एसीबीची ट्यूबिंग चोरट्यांनी लांबवली. डॉ.रत्नानी यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.