किनगाव बसस्थानकावर बसच्या मागील चाकात आल्याने गुजरातमधील वयोवृद्धेचा मृत्यू


An elderly man in Gujarat died after being hit by the back wheel of a bus at Kingaon bus stand यावल (13 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील किनगाव येथील बस स्थानकावर बसमध्ये बसत असताना मागील चाकात आल्याने 81 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती. हा अपघात गुरुवारी सकाळी दहा वाजता घडला होता. महिलेला तातडीने उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात देण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. कमलबाई रामराव अंडाईत (81, रा.अहमदाबाद, गुजरात) असे मयताचे नाव आहे.

यावल पोलिसात अपघाताची नोंद
मयत कमलबाई या अहमदाबाद येथे आपल्या घरी जात असताना अपघात घडला. अपघाताची माहिती मिळतात परिवहन मंडळाचे पथक पोलिसांचे पथक किनगावला दाखल झाले. बसचा पंचनामा करून यावल आगारात बस लावण्यात आली. याप्रकरणी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. किनगाव गावातील स्थानकावर रावेर एस.टी. आगाराची बर्‍हाणपूर-सुरत ही बस (क्रमांक एम. एच. 20 बी. एल. 3397) घेऊन चालक खेमचंद तेली (42) हे यावलकडून चोपड्या कडे जात होते. बस स्थानकावर बस लावत असतांना बसमध्ये बसण्या करीता प्रचंड गर्दी झाली व गर्दीमध्येच मागच्या चाकात कमलबाई रामराव अंडाईत या अडकल्या आणि त्यांच्या दोघा पायावरून बसचे मागील चाक गेल्याने दोघा पायांना जबर दुखापत झाली.

पंचनामा करीत बस जप्त
घटनास्थळी तातडीने बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, रवींद्र ठाकूर, काँग्रेसचे बशीर तडवी, पिना कोळी सह नागरिकांनी धाव घेतली व तातडीने महिलेला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारदरम्यान महिलेचा मृत्यू झाला.. अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उमेश महाजन हे दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून बस यावल एस.टी. आगारात लावण्यात आली.


कॉपी करू नका.