पोलीस ठाण्यातच महिला कर्मचार्‍याचा विनयभंग : आरोपीला अटक


Woman employee molested in police station itself : Accused arrested निजामपूर (13 सप्टेंबर 2024) : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एकाने महिला पोलिसासोबत असभ्य वर्तन करीत व्हिडिओ शुटींग करून महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केला. ही संतापजनक घटना साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी घडली. संशयीत मनीष आपू बहिरम (32, नवापाडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

महिला कर्मचार्‍याचे केले शुटींग
निजामपूर पोलिसात नवापाडा गावातील मनीष आपू बहिरम (32) हा गुरुवारी गावातील वादा संदर्भात तक्रार देण्यासाठी आला असता त्यास बसण्यास सांगितल्याने त्याने 32 वर्षीय महिला पोलीस कर्मचार्‍याचे मोबाइलवरून चोरून शूटिंग केले. यावेळी संशयीताने धिंगाणा करीत वाद घातला व महिला पोलिसाचा विनयभंग केला. महिला कर्मचार्‍याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !