चोरवडला भाऊबंदकी उफाळली : हाणामारीत दोन्ही परिवारातील चौघे जखमी


Siblings broke out in Chorwad : Four members of both families were injured in the clash भुसावळ (14 सप्टेंबर 2024) : भुसावळ तालुक्यातील चोरवड येथे किरकोळ वादातून दोन परिवारातील भाऊबंदकीत आर्थिक वादातून शाब्दीक वाद हाणामारीवर पोहोचल्याने चौघे जखमी झाले. ही घटना बुधवार, 11 रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी चौघांविरोधात परस्परविरोधी गुन्हा भुसावळ तालुका पोलिसात दाखल करण्यात आला.

दोन कुटूंबियांतर्फे परस्परविरोधात तक्रार
पहिल्या गटातर्फे रतन पुंडलीक ठाकरे (76, चोरवड) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत राजेश रतन ठाकरे व सविता राजेश ठाकरे (दोन्ही रा.चोरवड) यांनी त्यांचा मोठा मुलगा व नातू अर्जुन रतन ठाकरे व चंदन अर्जुन ठाकरे यांना शिविगाळ करीत डोक्यावर दगड मारून जखमी केले. दुसर्‍या गटातर्फे राजेश रतन ठाकरे यांनी फिर्याद दिली. संशयीत रतन पुंडलिक ठाकरे व अर्जुन रतन ठाकरे (चोरवड) यांनी शिविगाळ करीत फिर्यादीची पत्नी व मुलगा सविता राजेश ठाकरे व सचिन राजेश ठाकरे (चोरवड) यांच्या डोक्यात लाकडी काठी मारल्याने दुखापत केली. तपास पोलीस निरीक्षक् महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप बडगे करीत आहेत.

 


कॉपी करू नका.