किरकोळ वादातून भुसावळात तरुणाला मारहाण
भुसावळ (14 सप्टेंबर 2024) : गणपती दर्शनाहून घराकडे परतलेल्या तरुणाला किरकोळ वादातून दोघांनी मारहाण केली. ही घटना 11 रोजी रात्री 11.30 वाजता लोणारी हॉलजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
विक्की हरिदास सोनवणे (24, श्री नगर लोणारी हॉलजवळ, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, बुधवार, 11 रोजी रात्री 11.30 वाजता संशयीत यश बाविस्कर व विजय कोळी (28, श्री नगर लोणारी हॉलजवळ, भुसावळ) यांनी डोक्यात लोखंडी कडे व पाठीत बुक्क्याने मारहाण करीत दुखापत केली. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.