भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह वरणगावातील संशयीत जाळ्यात
भुसावळ एमआयडीसी परिसरात बाजारपेठ पोलिसांची कारवाई
Bhusawal market police action : Gavathi Katta and two live cartridges in a suspicious net in Varangaon भुसावळ (14 सप्टेंबर 2024) : वरणगाव शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार हरीष राहुल उजलेकर (वरणगाव) यास बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वरणगावरोडवरील एमआयडीसी परिसरातून दोन जिवंत काडतूस व गावठी कट्ट्यासह अटक केली. 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयीताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आाल.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलीस निरीश्रक राहुल वाघ यांना संशयीत हरीष राहुल उजलेकर हा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार निलेश चौधरी, हवालदार महेश चौधरी, राहुल वानखेडे, भूषण चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल जावेद शहा आदींच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सहा वाजता हरिषला ताब्यात घेत त्याच्याकडून अंगझतीत 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.