जळगाव तालुक्यातील बेपत्ता बालकाचा विहिरीत मृतदेह सापडला

0

जळगाव (17 सप्टेंबर 2024) : गेल्या आठ दिवसापासून पंधरा वर्षीय मुलगा बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शनिवार, 14 रोजी संध्याकाळी एका विहिरीत आढळून आला. धनीश कुंवरसिंग चौहान (मूळ रा.लखनपूर, म.प्र. ह.मु. ठोरा,ता,जळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बेपत्ता बालकाचा मृत्यू
हा मुलगा शनिवार, 7 सप्टेंबरपासून अचानक बेपत्ता झाला. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. याप्रकरणी पोलिसात तक्रारीनुसार मिसिंगची नोंद केली होती. विहिरीत त्याचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, हवालदार अनिल फेगडे, किरण आगोणे, दीपक चौधरी घटनास्थळी रवाना झाले. मिसिंगच्या अनुषंगाने कुंवरसिंग चौंहान यांना पोलिसांनी बोलवून घेतले. त्यांनी पाहिल्यानंतर धनीश याची ओळख पटली. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. या वार्ता कानावर पडल्यानंतर कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांना जबर धक्का बसला.


कॉपी करू नका.