राज्यातील या भागात 2 ऑक्टोबरपर्यंत कोसळणार पाऊस !

0

जळगाव (18 सप्टेंबर 2024) : जळगावसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून आता पुन्हा एकदा पाऊस हळहळू सक्रिय होताना दिसत आहे. राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यातही बुधवारी सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे.

सप्टेंबरच्या शेवटपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज होण्याची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे.

या भागात कोसळणार पाऊस?
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

देशातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. हवामान तज्ज्ञांच्या मते, दोन-चार दिवस दिल्लीतसह अनेक राज्यांमध्ये पाऊस बरसत राहील. खचऊ ने आज दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात ढगाळ पावसाचा अंदाज जारी केला आहे.

 


कॉपी करू नका.