डॉ.जयवंतराव देवरे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मवीर : चाळीसगावात झाला अभीष्टचिंतन सोहळा

‘भूतान भटकंती’ पुस्तकाचेही झाले प्रकाशन

0

चाळीसगाव (19 सप्टेंबर 2024) : समाजाला देण्याचा भाव हरवत असतांना चार दशके डॉ. जयवंतराव देवरे यांनी वैद्यकीय व्यवसातून समाजाची सेवाचं केली. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील ‘कर्मवीर’ म्हणावे लागेल. दोन कॉट आणि एक टेबल घेऊन त्यांनी चाळीसगावला वैद्यकीय सेवा सुरू केली. आज हा वटवृक्ष फोफावला आहे. तथापि, गोरगरिब रुग्णांच्या सेवेत डॉ. देवरे व डॉ. उज्वला देवरे यांनी कधीही खंड पडू दिला नाही. असा सूर येथे मान्यवरांनी व्यक्त केला.

चाळीसगावात रंगला अभीष्टचिंतन सोहळा
मंगळवारी सिद्धी महिला मंडळ व डॉ. देवरे फाऊंडेशनने आयोजित केलेल्या डॉ. जयवंतराव देवरे अभीष्टचिंतन सोहळा व ‘भूतान भटकंती’ प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर चाळीसगाव मसाप शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, चाळीसगाव एज्यु. सोसायटीचे संचालक डॉ. सुनील राजपूत, कर सल्लागार शशिकांत धामणे, डॉ. राजेंद्र आहेर, प्रा. विजय चव्हाण, डॉ. उज्वला देवरे, डॉ. सौरभ देवरे आदि उपस्थित होते. यावेळी डॉ. देवरे यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीचा आढावा घेतांना सांगितले की, सतत नवीन शिकण्याच्या ध्यासातूनच आपण रुग्णांना सर्वोत्तम सेवा देऊ शकलो. धाडस करतांना त्यात यशस्वी व्हायचच. अशी जिद्द असेल तर केलेल काम कौतुकाला पात्र ठरते. डॉ. उज्वला देवरे यांनीही आपल्या सहजीवनाचा प्रवास मांडला. यावेळी कवी, साहित्यिक व पत्रकार जिजाबराव वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राचार्य ब्रिजेश पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी संदीप जैन, अनुजा, सरोज जाधव, सीमा शर्मा, सरला साळुंखे, माया पाटील, संदीपप साळुंखे, डॉ.शैला अरकडी यांनी परिश्रम घेतले. आभार सीमा शर्मा यांनी मानले. सिंगिग हार्टस गृपच्या संगीत मैफिलिनेही यासोहळ्याची रंगत वाढवली.

‘भूतान भटकंती’ पुस्तकाचे प्रकाशन
सिद्धी महिला मंडळाने भूतान यादेशाचा नुकताच प्रवास केला. ’भूतान भटकंती’ यापुस्तकाव्दारे ही सफर शब्दबद्ध करण्यात आली. अभीष्टचिंतन सोहळ्यात पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संपादन मंगला कुमावत यांनी केले आहे. भूतान प्रवासाविषयी भारती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


कॉपी करू नका.