दुचाकीच्या डिक्कीतून 83 हजार लांबवले : जळगावातील घटना

0

जळगाव (20 सप्टेंबर 2024) : दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी 83 हजारांची रोकड लांबवली. ही घटना रविवार, 15 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील भाऊंचे उद्यानासमोर पार्कींगला दुचकी लावली असता हा प्रकार घडला.

संधी मिळताच लांबवली रक्कम
इंद्रकुमार प्रेमचंद साहित्या (53 ,रा.सिंधी कॉलनी, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कापड विक्रीचा व्यवसाय ते करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवार, 15 सप्टेंबर रोजी ते जळगाव शहरातील भाऊंचे उद्यानावजवळ दुचाकीने आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी उद्यानासमोर पार्कींगला लावली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डीक्कीत ठेवलेली 83 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना रात्री 9 वाजेच्या सुमारास उघडकीला आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.