भुसावळातील प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यांचा सत्कार

0

Prof. Dr. Dayaghan S. Rane of Bhusawal felicitated भुसावळ (20 सप्टेंबर 2024) : भुसावळ शहरातील सोमाणी गार्डन परिसरातील भालचंद्र नगरात नुकत्याच साजरा झालेल्या गणेशोत्सवात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्राप्त झालेल्या व्यसनमुक्ती विषयावरील पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित करून व्यसनमुक्तीचा संदेश कॉलनीभर बिंबवण्यात आला. या कॉलनीचे रहिवासी प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यांचे व्यसनमुक्तीबद्दलचे कार्य व अलीकडेच मुंबईत झालेल्या सत्कारानंतर कॉलनीवासीयांनीही त्यांचा सत्कार केला.

सत्काराने मिळाली अधिक जोमाने कामाची प्रेरणा
हा कुटुंबातील सत्कार असून व्यसनमुक्ती प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचे कार्य तसेच संशोधनाचे कार्य करीत असताना हा सत्कार मला कायम प्रेरणा आणि बळ देत राहील, असे प्रा.डॉ.दयाघन राणे म्हणाले. प्रा.डॉ.दयाघन राणे यांचा विस्तृत परिचय अशोक चौधरी यांनी दिला तर आभार प्रा.डॉ.गजानन जाधव यांनी मानले. अशोक चौधरी यांच्या नेतृत्वात निखील कोलते, चंद्रकांत चौधरी, प्रा.डॉ.गजानन जाधव, तुषार चींधडे, प्रमोद पाटील, बापू पाटील, पवन पाटील, जीवन पाटील, संदीप कोलते, दिलीप ढाकणे, राजेश जोशी, शिरीष पिंपळे यांनी परिश्रम घेतले. प्रा.आशिष महाजन, विजय महाजन, किशोर नारखेडे, गाजरे, अजय महाजन, डी.टी.किरंगे व रहिवासी उपस्थित होते.


कॉपी करू नका.