कबड्डी स्पर्धेत तीन्ही गटात यावलच्या इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूलचे वर्चस्व

0

यावल (21 सप्टेंबर 2024) : शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूलच्या प्रांगणात गुरूवारी तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धा झाल्या. तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत 14, 17 व 19 वयोगटातील अंतिम सामने इंदिरा गांधी शाळेने जिंकत संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व सिद्द केले. हे संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळणार आहेत.

विविध शाळेतील संघ सहभागी
शहरात नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये गुरुवारी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा झाली. अध्यक्षस्थानी नॅशनल एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष हाजी शब्बीर खान होते. शाळेचे चेअरमन हाजी मुस्तुफा खान, सचिव हाजी जफरउल्ला खान, गुलाम रसूल अजीज खान, मुख्याध्यापक गुलाम गौस खान व मुख्याध्यापक तूफेल अहमद सह सर्व संचालक मंडळ प्रसंगी उपस्थित होते. उद्घाटन हाजी शब्बीर खान यांच्याहस्ते तर नाणेफेक हाजी मुस्तुफा खान यांनी केली. या स्पर्धेत तालुक्यातील 14 वर्ष वयोगट, 17 वर्ष वयोगट व 19 वर्ष वयोगटातील विविध शाळेतील मुलींचे संघ सहभागी झाले. या स्पर्धेत तिन्ही वयोगटातील कबड्डी स्पर्धा इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या संघांनी जिकल्या.

स्पर्धेकरीता सय्यद अशफाक अली, यावल तालुका क्रीडा समन्वयक दिलीप संगले व राष्ट्रीय पंच खिदा सय्यद इरतेकाज अन्वर, शाळेचे क्रीडा शिक्षक शेख सलीम, ए.डी.पाटील सह तालुक्यातील इतर क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले. पठाण अर्षद खान व कामील शेख यांनी गुण नोंदवण्याचे काम केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज बानो, मरियम बानो, गुलनाज बानो, इमाम शेख, शेख इफ्तेखार, नूर मोहम्मद व शेख फहीम यांनी यशस्वीते करीता परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार इद्रिस खान यांनी मानले.


कॉपी करू नका.