चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी : सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुसासह पुण्यातील संशयीत जाळ्यात

0

जळगाव (21 सप्टेंबर 2024) : चोपडा ग्रामीण पोलिसांनी उमर्टीकडून लासूर-हातेड मार्गावर गावठी कट्टे व जिवंत काडतूस बाळगणार्‍या दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून सात गावठी कट्टे, दहा जिवंत काडतुस दुचाकी तसेच मोबाईल असा सुमारे दोन लाख 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई शुक्रवार, 20 रोजी करण्यात आली. सागर शरणम रणसौरे (24, रा.धावरी फाटा, पुणे) व मनोज राजेंद्र खांडेकर (25, रा.जुळेवाडी, ता.कराड) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

दोन्ही कुविख्यात गुन्हेगार
दोघांविरोधात पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयितांनी गावठी कट्टे व जिवंत काडतुस पार उमर्टी (मध्यप्रदेश) येथून खरेदी केली. त्यानंतर हा अवैध शस्त्र साठा ते दुचाकीने नेत असताना गोपनीय माहितीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात चोपडा ग्रामीण निरीक्षक कावेरी कमलाकर, हवालदार राकेश पाटील, शशिकांत पारधी, रावसाहेब पाटील, चेतन महाजन यांनी ही कारवाई केली. होमगार्ड प्रदीप शिरसाठ, पोलीस मित्र महेश दत्तू देवराज कोळी, नरेंद्र मोरे यांचे सहकार्य लाभले.


कॉपी करू नका.