जळगावात वाईन शॉपमधून पाच लाख 70 हजार लूटले : दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

0

5 lakh 70 thousand looted from a wipe shop in Jalgaon: Two arrested by crime branch जळगाव (21 सप्टेंबर 2024) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने शहरातील गुजरात पेट्रोल पंप परिसरातील एन.एन.वाईन सेंटरमधून पाच लाख 70 हजारांची रोकड लांबवल्याप्रकरणी सचिन अभयसिंह चव्हाण (26, रा.शंकर आप्पा नगर, पिंप्राळा, जळगाव) व अक्षय नारायण राठोड (22, रा.यश नगर, पिंप्राळा, जळगाव) यांना अटक केली आहे.

असे आहे लूट प्रकरण
रविवार, 15 सप्टेंबर 2024 रोजी जळगाव शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील एन.एन.वाईन सेंटर या दुकानात काही इसमांनी दहशत माजवून काउंटरमधील पाच लाख 70 हजार रुपये जबरीने गेले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती.

गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
दोघे आरोपी पाळधी येथील साईबाबा मंदिरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, राहुल पाटील आदींच्या पथकाने दोघांना अटक केली. अटकेतील दोघांनी या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून 68 हजार 500 रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली बुलेट जप्त करण्यात आली. आरोपींना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

 


कॉपी करू नका.