प्रवाशांना दिलासा : दहा रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
Relief to passengers: Extension of ten railway trains भुसावळ (25 सप्टेंबर 2024) : आगामी सण-उत्सव व सुट्यांचे दिवस पाहता रेल्वे गाड्यांना वाढणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने दहा विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
गाडी क्रमांक 01139 नागपूर-मडगाव विशेष गाडीला 28 डिसेंबरपर्यंत तर गाडी क्रमांक 01140 मडगाव-नागपूर विशेष गाडीला 29 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. गाडी क्रमांक 01211 बडनेर -नाशिक अनारक्षित विशेष गाडीला 31 डिसेंबरपर्यंत तर गाडी क्रमांक 01212 नाशिक-बडनेरा अनारक्षित विशेष गाडीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. गाडी क्रमांक 01091 खंडवा-सनावद व गाडी क्रमांक 01092 सनावद-खंडवा अनारक्षित विशेष गाडीला 31 डिसेंबरपर्यंत तसेच गाडी क्रमांक 11025 दादर-बलिया गाडीला 30 डिसेंबर व गाडी क्रमांक 11026 बलिया-दादर विशेष रेल्वेला 1 जानेवारी 2025 पर्यंत चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 11027 दादर-गोरखपूर विशेष रेल्वेला 31 डिसेंबर तर गाडी क्रमांक 11028 गोरखपूर-दादर विशेष रेल्वेला 2 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.