मुक्ताईनगरातील लेट लतीफ पंचायत समिती कर्मचार्‍यांचा आमदारांकडून सत्कार

पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारीपदी अजय चौधरी


मुक्ताईनगर (26 सप्टेंबर 2024) : मंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून दोन दिवसांपूर्वीच कुलूप लावल्यानंतर गटविकास अधिकारी निशा जाधव वैद्यकीय सुटीवर जाताच प्रशासनाने येथे प्रभारी अधिकारी म्हणून अजय चौधरी यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवल्यानंतर पंचायत समितीचे दालन उघडण्यात आले. दरम्यान, मिनी मंत्रालयातील कर्मचार्‍यांच्या मनमानीचा तक्रारी असताना बुधवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीत एक ते दिड तास उशिराने येणार्‍या कर्मचार्‍यांचा गुलाबपुष्प देवून सत्कार केल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली.

आमदार म्हणाले : घडल्या प्रकाराची माहिती जाणली
बुधवार, 25 सप्टेंबर रोजी आमदार चंद्रकांत पाटील हे सकाळी दहा वाजेपासून ते साडेअकरा वाजेपर्यंत पंचायत समितीत बसून होते यआमदार म्हणाले की, पंचायत समिती कार्यालयात काहीतरी हालचाली व उलाढाली झाल्याचे तसेच मंत्र्यांनी कुलूप लावून केलेल्या आरोपानंतर त्याबाबत माहिती घेण्यासाठी आपण पंचायत समितीत सकाळी पावणेदहाला आलो. 11 वाजेपर्यंत नूतन गटविकास अधिकारी आले नाही शिवाय आपल्याला लेखी तक्रारी या ठिकाणी पहायला मिळाल्या नाहीत.








फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पगुच्छ देवून स्वागत
आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यालयात उशिरा येणार्‍या ‘लेट लतीफ’ कर्मचार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. कर्मचार्‍यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी केलेले हे उपहासात्मक कृत्य त्यांना ओशाळवणारे ठरले. उपस्थित लोकांच्या देखत झालेल्या या प्रकारामुळे संबंधित कर्मचारी वर्गाला आपल्या कर्तव्याच्या अनुषंगाने शिस्त पाळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

किमान आतातरी शिस्त पाळण्याची अपेक्षा
आमदार चंद्रकांत पाटील यांनी कर्मचार्‍यांना शिस्त आणि वेळेचे महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी विनोदी पद्धतीने हा उपक्रम राबवला. त्यांची ही ‘गांधीगिरी’ संबंधित कर्मचार्‍यांसाठी एक धडा ठरली असून या घटनेनंतर कर्मचारी वेळेवर येण्याची अपेक्षा आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !