यावलमधील नवभारत गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी भूषण फेगडे
यावल- शहरातील महाजन गल्लीतील नवभारत गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रमोद नेमाडे होते. प्रा.चोपडे यांनी सूत्रसंचालन केले. यंदाच्या गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी भूषण जगन्नाथ फेगडे तर उपाध्यक्षपदी स्नेहल फिरके तसेच खजिनदारपदी निर्मल चोपडे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारीणीत सचिवपदी दिवाकर फेगडे तर सहसचिव डिगंबर फेगडे यांची निवड करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धीरज महाजन, भाजप शहराध्यक्ष हेमराज फेगडे, माजी नगरसेवक उमेश फेगडे, डॉ.कुंदन फेगडे, अजय फेगडे, ओंकार राणे व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रीतेश बारी, किशोर महाजन, कल्पेश चौधरी, हेमंत फेगडे उपस्थित होते.