आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण न दिल्यास गणित बिघडवणार ! : मनोज जरांगे पाटलांचा इशारा

If the reservation is not given before the code of conduct, the math will be spoiled! : Warning of Manoj Jarange Patal छत्रपती संभाजीनगर (03 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिले नाही तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. आज रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याअगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.
तर आमचा नाईलाज
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आण त्यानंतर आम्ही राजकारण केले तर आमच्या कानाला धरा पण त्यांनी हे जर नाही केले तर माझा नाईलाज आहे. त्यांचे नेते त्यांना समजून सांगतील अजून 8 ते 10 दिवस वेळ आहे, त्यात काही होईल अशी आशा असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. मी कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी आंदोलनात उतरलेलो नाही. माझा एकच स्वार्थ आहे माझ्या समाजाचे भले झाले पाहिजे. बाकी मनोज जरांगे मुख्यमंत्री वगैरे या सगळ्या लोकांच्या भावना आहेत. मी राजकारणासाठी नाही तर समाजासाठी या सगळ्यामध्ये उतरलो आहे. योग्य वेळ आल्यानंतर योग्य संधी येते तशी आता आली आहे. गोरगरीब मराठे, दलित, ओबीसी, मुस्लिम यांनी सगळ्यांच्या एकजुटीची लाट आली आहेत. यानंतर ही लाट येणार नाही त्यामुळे हीच संधी आहे. गोरगरिबांना आरक्षण मिळण्याची हीच संधी आहे.
सर्व मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीचा अनुभव घेत विधानसभेची आचारसंहिता लागू देणार नाही, ते निवडणूक पुढे ढकलतील किंवा मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करतील ही 100 टक्के खात्री आहे.
