धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : मोक्काच्या गुन्ह्यातील पसार संशयीतांकडून चोरीच्या 33 दुचाकी जप्त

उत्तर महाराष्ट्रासह, नाशिक, शिर्डी, पुण्यातील 32 गुन्हे उघडकीस


Performance of Dhule Crime Branch : 33 stolen bikes seized from Pasar suspects in Mokka crime धुळे (03 ऑक्टोबर 2024) : मोक्काच्या गुन्ह्यात पसार असलेल्या अट्टल आरोपीला धुळे गुन्हे शाखेने बेड्या ठोकत त्याच्याकडून तब्बल चोरीच्या 33 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने जळगाव, धुळे, नंदुरबारसह हिंजवडी, नाशिक व पुणे भागातून या दुचाकी चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. धुळे गुन्हे शाखेच्या विशेष कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष कौतूक केले. योगेश शिवाजी दाभाडे (24, बळसाणे, ता.साक्री) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील गरुड कॉम्ल्पेक्स समोरुन 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी जितेंद्र गुलाबराव पाटील (रा.धुळे) यांची दुचाकी (एम.एच.18 ए.बी. 2444) चोरीला गेल्यानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना दुचाकी चोरीचे गुन्हे योगेश शिवाजी दाभाडे (24) हा करीत असल्याची व तो गावी  बळसाणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले व आरोपीला अटक करण्यात आली.

33 दुचाकी जप्त
आरोपी योगेशला बोलते केल्यानंतर त्यांनी धुळे, शिंदखेडा, पुणे, शिर्डी, मालेगाव, सटाणा, चाळीसगाव, नंदुरबार येथून 33 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या व विक्री केलेल्या 33 दुचाकी काढुन दिल्या. 22 लाख 25 रुपये किंमतीच्या 33 दुचाकी जप्त केल्यानंतर आरोपीला धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून धुळे शहरातील 11, नाशिक जिल्ह्यातील 14, पुणे तीन, जळगाव दोन, शिर्डी एक, नंदुरबार एक अशा एकूण दुचाकी चोरीचे 32 गुन्हे उघडकीस आले.

आरोपी मोक्काच्या कारवाईत पसार : यापूर्वी दहा गुन्हे
आरोपी योगेश दाभाडे याच्याविरोधात पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात चैन स्नॅचींगचे गुन्हयात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली मात्र तो पसार झाला. आरोपीविरोधात रामानंद पोलीस ठाणे (जळगाव), भोसरी पोलीस ठाणे (पुणे), पिंपरी पोलीस ठाणे (पुणे), पारोळा पोलीस ठाणे (जळगाव), धुळे शहर पोलीस ठाणे (धुळे), अंबड पोलीस ठाणे (नाशिक), गंगापूर पोलीस ठाणे (नाशिक), दोंडाईचा पोलीस ठाणे (धुळे), हिंजवडी पोलीस ठाणे (पुणे) येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

यांनी उघडकीस आणले गुन्हे
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहा.निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, संजय पाटील,  मायुस सोनवणे, सदेसिंग चव्हाण, संतोष हिरे, धमेंद्र मोहिते, योगेश जगताप, किशोर पाटील, अतुल निकम, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.